गोळा केलेल्या निर्माल्या पासून 800 किलो सेंद्रीय खताची निर्मिती 

गोळा केलेल्या निर्माल्या पासून 800 किलो सेंद्रीय खताची निर्मिती
*  पेण मधील श्री सदस्यांचा स्तुत्य उपक्रम 
पेण , ता.11 ( वार्ताहर ) : गणेश विसर्जन वेळी गोळा करण्यात आलेल्या निर्माल्या पासून आठशे किलो सेंद्रीय खताची निर्मिती करुन पेण मधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्तुत्य उपक्रमाचा पायंडा पाडला आहे. 
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण व संवर्धन , स्वच्छता अभियान, प्रौढ साक्षरता वर्ग,विहीर पुनर्भरण असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मागील दोन वर्षांपासून गणेश विसर्जन वेळी नदी व तलावात होणारे निर्माल्य गोळा करुन त्यापासून खत निर्मिती करण्याचा उपक्रम अभियाना मार्फत राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत पेण तालुक्यातील पेण,वाशी,रावे,वाशी नाका,वरवणे,वरसई,सापोली, धावटे, वडखळ,जिते , हनुमान पाडा,आंबिवली,दादर,शिर्की,भाल  अशा सोळा बैठकांतील  1341 श्री सदस्यांनी सप्टेंबर महिन्यात दीड दिवस , पाच दिवस व गौरी विसर्जन वेळी 27 टन निर्माल्य गोळा केले होते. मागील पाच महिने या निर्माल्या वर प्रक्रिया करून त्या पासून आठशे किलो सेंद्रीय खत तयार करण्यात पेण मधील श्री सदस्यांना यश मिळाले आहे. या सेंद्रीय खताचा उपयोग श्री सदस्यांनी केलेल्या वृक्षारोपण करण्यात येणार आहे.पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी निर्माल्य पासून तयार करण्यात आलेल्या खत निर्मिती उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.


फोटो ओळ - पेण येथील श्री सदस्यांनी निर्माल्य पासून तयार करण्यात आलेले सेंद्रीय खत


Popular posts